उझबेकिस्तानातील; ताश्कंदकडे आणि ताश्कंदमध्ये
उझबेकिस्तानातील; ताश्कंदकडे आणि ताश्कंदमध्ये भाग ३ - मुंबईहून शारजाह मार्गे ताश्कंद मुंबईहून पहाटेच्या एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहला पोहोचलो तेव्हा तिथे नुकतंच उजाडलं होतं. शारजाहला आम्ही प्रस्तावित वेळेत पोहोचलो होतो. मुंबईहून आमचं विमान जवळजवळ पाऊण तास उशिराने सुटल्याने आम्ही थोडे काळजीत होतो कारण नंतर आम्हाला एअर अरेबियाच्याच विमानाने शारजाहहून ताश्कंदला जायचं होतं. मध्ये फक्त अडीच तासांचा थांबा होता. मुंबईहून निघताना उशीर झाल्यामुळे आम्ही त्यासंदर्भातील काळजी तिथल्या कर्मचाऱ्यांकडे व्यक्त केली होती त्यावर ‘तुम्ही काळजी करू नका. पायलट विल मेकअप दॅट टाईम’, असं उत्तर मिळालं होतं. ट्रेन्स ‘टाईम मेकअप’ करतात हे अनुभवलं होतं पण ‘प्लेन’साठीचं ‘टाईम मेकअप’ नवीन होतं. पायलटने खरंच विमान वेगात चालवलं असावं. शारजाहला आम्ही नियोजित वेळेवर पोहोचलो. त्या विमानात ब्रेकफास्ट झाला होता. पण फक्त ब्रेकफास्ट; जोडीला चहा वगैरे नाही. त्याबरोबर पाण्याची एक छोटी बाटली मिळाली होती. ती ब्रेकफास्ट बरोबरच संपली. मुंबईलाच आम्हाला मुंबई ते शारजाह आणि शारजाह ते ताश्कंद प्रवासासाठीचे ‘बोर्डिंग पास...